गुरू पौर्णिमा…Guru Poornima…

गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा🙏🏼🙏🏼🙏🏼
गुरू ब्रम्ह, गुरू विष्णू, गुरू देवो महेश्वर,

गुरू साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः।।

गुरु पूर्णिमा
गुरु म्हणजे कोण…?
ना वयाचे बंधन…ना नात्याची जोड
त्यास नाही कोणाची तोड

ज्यासी आहे अगाध ज्ञान

जो करी त्याचे निस्वार्थ प्राख्यान

त्याची सी गुरु मानावे

देवास तेथेची पावावे ।

माझी आई माझी आद्य गुरु
दिलेसी मज जीवन करूनी सूरू

माझे पिता झाले मम द्वितीय गुरु
कष्टांने केलेसी पायावर उभं तरू

माझे मित्र पण झाले माझे गुरु
शिकवले मजसी जीवनात कशी मैत्री करू

विद्यालयातील शिक्षक निरंतर गुरु
करतृत्ववान केलेसी करून शून्यातून सूरू

माझा जीवन-सखा देखील मम गुरु
देतोसी दैनंदिन जीवन मार्गदर्शन करू

देते मजं रोज नवीन ज्ञान, माझे लहान लेकरू
आई जरी मी , झाले लेकरू माझे महान गुरु

जीवनातील प्रत्येक टप्यात जनासी भेट करू
शिकवले काही थोडेसे सर्वांनी बनून माझे गुरु 

ज्याने शिकवीले मजसी तोची मानावा गुरु 
सर्व गुरुंना वंदन करूनी करू गुरु पूर्णिमा सुरू

नम्रता कुलकर्णी 
बेंगलुरु, ०९ जुलै १५

आतुरता… Aaturataa…

आतुरता…

आभाळ कसं हे भरलय्,

सुसाट बघ वारं सुटलय्,

फुलवतो पिसारा समोर,

नाचतोय् हा मनाचा मोर। 

पांघरूनी काळ्या मेघांनी,

पावसाच्या गार धारांनी, 

शोधू कसे तुज नंदकिशोर,

लपलाय् कुठे माखन चोर ?

वाट पाहता डोळे थकले,

धीर सुटूनी आतूर झाले,

लागलाय् ह्या मनास घोर,

उगवली स्वप्नमय भोर।

गाणे झाले निशब्द माझे

सूर कुठे हरवले शब्दांचे,

जेव्हां दिसला तो समोर, 

मुरलीधारी चांद चकोर।

डॅा नम्रता कुलकर्णी

बेंगलुरु२४/१२/१६

आग…Aag…

आग…

बातों बातों में यूँ फ़ैल जाती क्यूँ ये,
सरगोशियाँ क़ाबू में ना आती क्यूँ ये ?

अरमानों की धीमी सी है सुलगती,
कभी गलीयों शहरों से गरजती क्यूँ ये ?

मोहब्बत में ज़लवे भी दिखाती ये,
इश्क़ में जलाकर ख़ाक कराती क्यूँ ये ?

इन्सान को इन्सानीयत ना है भाती,
जलने की बूं फ़िजा में बिखराती क्यूँ ये ?

दावाग्नि को सुखे पत्तों सा है फैलाती,
धुएँ के मानिंद रिश्तों को उड़ाती क्यूँ ये ?

तपते धूप में काया को है तरसाती,
पानी की प्यास में बदन तड़पाती क्यूँ ये ?

किसी गरीब के घर चुल्हा ये चलाती,
अमीरों की होलीयों को बहलाती क्यूँ ये ?

इधर माचीस से बीडी को है जलाती,
धगधगती चीता में मुक्ती दिलाती क्यूँ ये ?

गो बातों से भी कभी फ़ैल है जाती,
ये आग, आग को अजीब लगाती क्यूँ ये ?

डॅा नम्रता कुलकर्णी
बेंगलुरु ०८/११/१६