अश्रू…Ashru…

Advertisements

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे…? konachya khandyawar konache ojhe…?

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,

जगतात येथे म्हणूनी तुझे न माझे।

कुणा साठी कोणी नाही आज इथे,

अश्रूंच्या भावनांचं पाणी जिथे थिजे।

कोमेजल्या मनाच्या संवेदना जिथे,

कसे उगवतात गुलाब रोज हे ताजे ?

खुर्चीच्या मानाला ना साजेनासे वागे,

तरीही म्हणतात आम्हीच तुमचे राजे !

धगधगती चिता विजली नाही अजून,

तसबिरी वर चंदनाचा हार कसा साजे ?

NK 26/8/17

प्राजक्त…Prajakta…

पहाट प्रहरी सखे साजणी,

प्राजक्ताचा सडा अंगणी।

आकाशगंगेतून शिंपडली,

जणू मिहिराने ती चांदणी।

काळ्या मातीला मोहरूनी,

गेलीस जवळून शिंपडूनी।

दवबिंदू सम अत्तर सुगंधी, 

श्वेत केशरी सौरभ स्पंदनी।

मोत्यांना त्या माळून वेचूनि,

अर्पूनी निराकारी निर्गुणी।

NK

20/07/17

गुलमोहर…Gulmohar…

गुलमोहर…
करीत रणरणत्या उन्हाशी सामना,पेटला ग वैशाखाचा वणवा,

कुठे हळूच डोकावतो जणू हिरव्या पानांचा थंड गारवा।
लाल पिवळ्या हळदी कुंकवाच्या रंगापरी निळ्या आभाळात शोभला,

मोठया तोऱ्यात डोले गुलमोहर, करी सामना तेजोन्मयी मिहीरा शी एकाला।
निळ्या नभाच्या शालू वर जणू कशिदा कारी नारंगी धाग्यांची,

नटून थटून सजलेली वसुंधरा वाट पाहते मेघ राजाची ।
तर असा हा गुलमोहर सखे, मज मनासी भावून गेला,

आकाशगंगेतून जणू चित्रगुप्ताने धरला कुंचला आणि रेखीत गेला।
NK

१५/०५/१७

गुढी पाडव्याच्या शुभेच्छा…

चैत्र सुरू झाला, करू साजरा गुढी पाडवा,
नवीन वर्ष साजरे करून, आनंद द्विगुणीत वाढवा।
घराच्या अन मनाच्या ही सफाईचा केर काढावा,
जुन्या नवीन सर्व नात्यांचा स्नेह संबंध जोडावा।
जुने वर्ष सरले, तसे लोभ मत्सर बाजूला सारावे,
नवीन वर्षात तुम्हास प्रेम, करूणा नी वात्सल्य लाभावे।
नव वर्षाच्या शुभेच्छा 🙏🌾🌿🍃🌹🌷
NK
२८/०३/१७