तनहाई… تنہائی…

जीवन के इस दौर में, मैं और मेरी तनहाई ,दोनो अक्सर बाते करते है…
तू ना होती तो कैसा होता ,तू होती तो ऐसा होता…
तनहाई…

है साथ मेरे शैदाई, मैं और मेरी परछाई
हर सम्त जिधर देखूँ, हर मोड़ पे तनहाई

शैदाई दीवानगी
सम्त दिशा

बस्ती की गलियों में, अपना न पराया है
दिखती है गली कूचे, हर रुख़ पे सितम ज़ाई

सितम ज़ाई अत्याचार

ख़ल्वत थी जवानी की, ‘आदत कहते कोई
मशगूल कहे कोई, कोई कहे सौदाई

ख़ल्वत एकांतवास
सौदाई पागलपन

अब तो न रहा हमदम, हमराह तमाशाई
इस दिल को है बहलाती, रातों की वो शहनाई

अफ़लाक की लाली ये, किस रंगे हीना छाई
दामन पे किसी के क्यूँ, रंगे ख़ूँ की आराई

अफ़लाक अनेक आसमाँ
आराई डेकोरेशन
ख़ूँ ख़ून

रातों के अंधेरों में, शम्मा’अ है सितारों की
फिर चाँद वो जलता क्यूँ, देख अपनी शनासाई

शनासाई संबंध

दस्तक दी ख़ुदा ने जब, दर पर मिरे फ़रमाई
जाऊँ तो कहाँ जाऊँ, बिन तेरे ओ हरजाई

हरजाई आवारा

सजदा तेरा शुक्राना, छोड़ा न मुझे तनहा
उस वक़्ते नज़ा’ में दी, रब साथ ये तनहाई

वक़्त ए नज़ा आख़री साँस का वक़्त

डॉ नम्रता कुलकर्णी ‘हया’

वज़्न
221 1222 // 221 1222
बहरे हज़ज मुसम्मन अख़रब मक़्फूफ़ मक़्फूफ़ मुख़न्नक सालिम

تنہائی…

ہے ساتھ میرے شیدائی , میں اور میری پرچھائی
ہر سمت جدھر دیکھوں, ہر موڑ پے تنہائی

بستی کی گلیوں میں, اپنا نہ پرایا ہے
دکھتی ہے گلی کوچے, ہر رخ پے ستم زائی

خلوت تھی جوانی کی, عادت کہتے کوئی
مشگول کہے کوئی, کوئی کہے سودائی

اب تو نہ رہا ہمدم, ہمراہ تماشائی
اس دل کو ہے بہلاتی, راتوں کی وو شہنائی

افلاک کی لالی یہ, کس رنگ ہینا چھائی
دامن پے کسی کے کیوں, رنگے خوں کی آرائی

راتوں کے اندھیروں میں, شمع ہے ستاروں کی
پھر چاند وو جلتا کیوں, دیکھ اپنی شناسائی

دستک دی خدا نے جب, در پر مرے فرمائی
جاؤں تو کہاں جاؤں, بن تیرے و ہرجائی

سجدہ تیرا شکرانہ, چھوڑا نہ مجھے تنہا
اس وقت نزاع میں دی, رب ساتھ یہ تنہائی

ڈاکٹر نمرتا کلکرنی ‘حیا ‘

पूरी ग़ज़ल के लिए इस लिंक पर क्लिक करें

एकटी…Ekati…

एकटी…?

नभात तारकांचे जो,
दिवे अनंत लावतो
वनावनात दीप ही,
तो काजव्यांचे पेटतो

तो सळसळून वाहतो,
कुठे तरंगी नाचतो
तो पाचोळ्यास उडवूनी,
ते स्मृतिगंध सांडतो

झुळूक थंड थंड ती,
कुसुमे डोल डोलती
तयात रंग घालूनी,
बेधुंद रंग रंगतो

अखंड किलबिलीत ह्या,
ती पाखरे जी गातसी
सुरांचिया तो मैफलीत्
सूर सुरात लावतो

झऱ्यात खळखळून जो,
त्या जलचरांशी बोलतो
जो सागरात सांडूनी,
मोती अनंत सांधतो

अनेक प्रश्न अंतरी,
ही नांदी वादळाची का
कधी, कुठे, नी का कसे,
असंख्य प्रश्न घालतो

गदारोळात जीवनी
तो एकटीस पाहतो
ती कंदिलाची वात मग,
तो पेटवून ठेवतो

तमाची रात छेदूनी,
मेघात किरणे सोडूनी
परत मनासी माझिया,
‘तू धीर धर’ हे सांगतो

डॉ नम्रता कुलकर्णी
‘हया’

वाचिक पंचचामर छंद
वृत्त कलिंदनंदिनी
लगावली लगालगा ×४

संपूर्ण गझल साठी ह्या लिंक वर क्लिक करा


https://youtu.be/4ZyvHgV3O58?si=nQ7qcSj_TYRg0mmC

शिव तांडव स्तोत्र मराठी अनुवाद…

महाशिवरात्रि च्या शुभेच्छा 🙏😊🌷🌟🎉🎊✨️⚘️शिव तांडव स्तोत्र…
( स्वैर मराठी अनुवाद)
वृत्त कलिंदनंदिनी, पंचचामर छंद, लगावली लगालगा ×४


जटां मधून वाहते नदीश्वरी पवित्र रे
नागमोडी शोभितो तो कंठी सर्प मित्र रे
डमड् डमड् डमड् डमड् तो रौद्र डौर गर्जतो
शुभम शिवम नमोस्तुते शिवत्व तांडवम नमो ।।१।।

तरंग रंग हर्ष मोद जान्हवी चे शोभती
लटा जटा बटातुनी कपाळी ती विराजती
तो अग्नी मस्तकी जसा ललाटी सूर्य शोभतो
तो शीत अर्ध चंद्रमा रे माथी त्या प्रकाशितो ।।२।।

समावितो जगत जगत ते प्राणिमात्र अंतरी
अर्धांगिनी ती हिमपुत्री पार्वती समांतरी
अनुग्रही दयाघना तू सर्व व्यापी लोचना
त्रिलोकिच्या चराचराचे दिव्य लोक आत्मना ।।३।।

भुजंग वासुकि चे आभूषण मणी प्रदीप्त तो
दहा दिशांचिया देवींचे मुख प्रभेने उजळितो
गजेंद्र चीर चर्म अंगवस्त्र शंकरा नमो
मनः मनात शांति दे तू जीव जंतू रक्षितो ।।४।।

प्रदान कर तू संपदा मुकुटी चंद्रमा वसे
केश लाल नाग हार बांधूनी बटा दिसे
पायदान त्या फुलांच्या केशराने रंगता
पराग मिरवती कपाळी इंद्र विष्णू देवता ।।५।।

गुंतले कलाप केश दे तू सिद्धी नैतिकी
कामदेव भस्म होई अग्निकुंड मस्तकी
तू देवलोक वासी तू अधिपति तू स्वामी रे
मयंक भाल शोभतो तूच अंतर्यामी रे ।।६।।

त्रिनेत्र धारणी तू शंभू नाथ मन रमण जसा
रूपवान कामदेवा अग्नी विनाश होतसा
धगद धगद कपाळी तो ज्वालमुखी नाचतो
चित्रकार उच्च शिल्प त्या उमेचे कोरतो ।।७।।

त्रि भूवनी भार वाहे वैभवाची हो कृपा
मंदाकिनी जट धारी भाळी पुंज चांदोबा
अवसेच्या काळ राती गज चर्मी साजल्या
मेघ काळे काळे जैसे रुद्र कंठी सावल्या ।।८।।

शिरोधरा बाहुमूल ब्रह्म व्यापी अंतरा
नील पद्म उमले जैसे कंठी साज बावरा
रतिपती बलीचा नाश त्रिपुर अंधक विनाश
मृत्यू देवता विनाश तोडून भूलोक पाश ।।९।।

ॐ नमो नमः शिवाय भ्रमर वलय शोभते
मधू सुगंध शुभ कदंब सुमधुर डोलते
कामदेव बलि अस्त त्रिपुर अंधकी समस्त
यम किनाश हो उध्वस्त पाश तोडुनी स्वहस्त ।।१०।।

ढिमिड ढिमिड ढिमिड ढिमिड ढोल जैसे वाजती
तांडवे नर्तन करीत पद उमेश नाचती
अग्नीशिखा नृत्य माथी नाग श्वास सोडती
गरिमामय गगन चुंबी गोल गोल घुमती ।।११।।

अक्षय अनादि देव नमन भक्ती करीता
समभाव दृष्टी राखे राजा रंक एकता
तृणांकुरे कुमुदिनी समान मित्र शत्रुता
रत्न धूळ व्याल हार समवृत्ती मान्यता ।।१२।।

त्याग दोष दुर्गुणासी अश्रुपूर्ण नयनी जो
भागीरथी वाटिकेत वास करुनि राहतो
रूप चित्तपावनी हाथ डोई जोडुनी
शर्व मंत्र जाप कर सुख येईल सांगुनी ।।१३।।

देवांगनांचिया बटांत पुष्पहार केशरी
सुगंधमय परागकण करी शिवांग कस्तुरी
ती अंगकांती साजरी उमापती च्या अंतरी
प्रमोद हर्ष दे मला प्रसन्नता महेश्वरी ।।१४।।

जगीचे पाप नष्ट कर महान अष्ट सिद्धीनी
तू देवी स्त्री स्वरूपिणी तू अष्ट सिद्धी कामिनी
शिव: शिवम विवाह गान श्रेष्ठ ते जगी परम
महेश मंत्र जाप कर कष्ट नष्ट नमो शिवम ।।१५।।

स्तवन करीत उग्र स्तोत्र होती शुद्ध भाव हे
स्मरण सोम स्तोत्र नित्य व्यक्त होतं जावं रे
विरुद्ध ना मिळे गती श्रद्धावंत साथ हो
भ्रम मुक्त मोह मुक्त चिंतनात नाथ हो ।।१६।।

प्रदोष काळ होतसा संपन्न कर उपासना
गात पाठ नित्य काव्य रचित जे दशानना
रथ घोडा हत्ती युक्त अचल ऐश्वर्य मिळे
शिव तांडव स्तोत्र गात लक्षुमी घरी फुले ।।१७।।

इति श्री शिव स्तोत्रम संपूर्णम
डॉ नम्रता कुलकर्णी ‘हया’

संपूर्ण video साठी ह्या लिंक वर क्लिक करा


https://youtu.be/hP975bb3fe8?si=F9UqmyQPq5jiHhS0

जन्म जन्म शोधिता

२६ फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांची पुण्यतिथी अन २७ फेब्रुवारी कुसुमाग्रज ह्यांच्या जन्मदिनी साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन, ह्या दोघांनाही मानाचा मुजरा करून, सावरकरांच्या एका प्रसिद्ध नाट्य गीतावरून प्रेरणा घेऊन हे माझं आजचं गीत प्रस्तुत करते आहे…
जन्म जन्म शोधिता…

जन्म जन्म शोधिता, शोधिते ही कस्तुरी,
आर्ति व्यर्थ जाहल्या, चित्त होई केशरी

मर्मभेदी ती नजर, घाव वर्मी घालते
ठाव काळजात ती, लक्ष्यवेधी वेधते,
रे सख्या कुण्या युगी, गाठ झाली अंकुरी

सूर्य मालिका इथे, युगांतरी च्या लोपल्या
दिप आवल्या इथे, अंतरंगी तेवल्या
वाट पाहते सख्या, जन्मीच्या रे अंतरी

भास भास होतो का, श्वास श्वास रोखूनी
पापणीत साचते, स्वप्न माझे भिजुनी,
भेट ही जीवांची जी, होतसे कधीतरी

गाठी गाठी बांधूनी, बांधतो तो बंधने,
बांधली गेली कुठे, ही मनाची स्पंदने
पाहण्यास रे तुला, जीव हा अधांतरी

क्षण क्षणात लोटतो, वाट पाहते तरी,
कंदिलाची वात मी, तेवते रे उंबरी,
गीत छेडिता मनी, रंगते विभावरी

डॉ नम्रता कुलकर्णी
‘हया’

संपूर्ण video साठी ह्या लिंक वर क्लिक करा


https://youtu.be/JuEE53vtKko?si=XTuaI0IgVV4go3DK

राजा…

राजा…

जय श्री छत्रपती राजा, जय श्रीमंत योगी राजा

शिवनेरी ची तोफ कडाडे, हृदय मावळ्यांचे ही दहाडे
भगवा फडकवून पहाडे डंका डोंगरी वाजे नगाडे
सह्याद्रीची सिंह गर्जना शिव शंभू राजा

पुत्र जिजाऊ चा हा मराठा शान स्वराज्याचा
मुघलांना तडीपार करविले
सुवर्ण काळांचा
छत्रपती तो शिवबा आमुचा जाणता हा राजा

सह्याद्रीच्या कड्याकपारी खनकती तलवारी
हिरव्या धरणी तिलक माथी तो बघ भगवा धारी
दिल्ली चा ही तख्त राखितो नसे कोणी दुजा

केली त्याने मात शत्रूवर गनिमी केला कावा
माय भवानी च्या कृपेचा मर्दानी छावा
हर हर महादेव गर्जा हो, हर हर महादेव गर्जा

डॉ नम्रता कुळकर्णी ‘हया’

नको शोधूस मला…

Happy valentines day to all…🌹💖🌟✨️🎊🎉…the world needs more love and not hate…

नको शोधूस मला…

नको शोधूस मला
कवितांच्या शब्दात
न कोऱ्या पानांच्या
कोऱ्या मृद गंधात

मी नसेन नीलशाईत
न कुण्या छंदात
व्यर्थ अर्थ लावण्या
पडू नकोस फंदात

नक्षत्रांचे ते चांदणे
शिंपडून अंगणात
नको उमलू स्वप्नांची
फुले ह्या प्रांगणात

प्रेमाने छेडिता झंकार
गंधाळलेल्या श्वासात
सूर अनुरागी हृदयात
नसेन रुधिर स्पंदनात

वारा बोचेल तो जेव्हां
ओथंबलेल्या स्पर्शात
अधीर पाकळ्यांच्या
मी नसेन गंधकोशात

रानोमाळी उठतील
वादळं पर्ण पर्णात
पर घनव्याकुळ तरंगे
शांत चांदण डोहात

नको शोधूस पायवाटा
मनस्वी चांदणचुऱ्यात
आशेचा एक कंदील
मिणमिणतो अंतरात

भेटेल तुलाही कुण्या
तारकांची मंथर रात
जागवेल जी तुझ्या ही
मन मंदिरी दीपवात

सापडेन मूर्त तेथेच
पुरातन स्वप्नभंगात
भग्न अंधवेड्या मनात
चुंबुनी जिथे सोडला होतास हात…

डॉ नम्रता कुळकर्णी ‘हया’

See the full video on this link


https://youtu.be/Bq5McWsT7xw?si=EpyL0FzsGZjf1AR4