बेभान वारा… Bebhan Wara…

बेभान वारा…

सुटला सर्द बेभान वारा,
स्मृती-ढगांना उधळून गेला,
स्वप्न-पंखांच्या कवेत घेऊन,
डोंगरापल्याड उडवून गेला।

डोंगर-दऱ्या, नदी-नाले, झावळ्या पार ओलांडूनी,
स्मृतींच्या सुगंधाचा मोहक मृदगंध दरवळून गेला।

काळ्या भोर मेघांची चादर, पांघरून, सौदामिनी संगे,
थंड मृगसरींनी माझीये अंग, चिंब चिंब भिजवून गेला।

गालावर कोवळ्या स्पर्शाने, हळुवार लहरींनी गोंजारून,
लडिवाळ उडणाऱ्या बटांना, माझिया कुरवाळून गेला।

वाट पाहता तुझी सख्या रे, सोबतीला होता माझीया,
पापण्यांच्या अश्रू-दवांना,
फुंकर मारून टिपून गेला।

नयनी साठलेले विरहाचे, निशब्द गाणं गुणगुणत,
हृदयीमनी भावनांचे श्वास कोंडून अदृश्य होऊन गेला

तुझ्या मिलना परी जीव माझा,
किती रे बघ आसुसलेला,
क्षितिज किनाऱ्या पल्याड,
मन पाखराला पंखावर घेऊन गेला।

डॉ नम्रता कुलकर्णी
बेंगलुरु
०६/०६/१७

Advertisements

इक शमा जलाये रखना…Ik Shamaa Jalaye Rakhana…Keep The Flame Of Hope Alive…

इक शमा जलाये रखना…

अंधेरी राह गर गुज़र गया,
इक शमा जलाये रखना
चिराग़ ए तूर गर बुझ गया,
इक शमा जलाये रखना

क़ातिब ने लिखी तक़दीर में पैहम आह ओ फुगान,
कुछ पा कर कुछ खोया, इक शमा जलाये रखना

राह मिलते सियाह बादल, कभी नूर ए हयात याँ,
गो न मिला शज़र का साया, इक शमा जलाये रखना

फ़राज़ ए अर्श से न देखा टूटता सितारा कभी,
न हो मुरादों से नामुराद मियाँ, इक शमा जलाये रखना

रहगुज़र मिले संग ए मोहतरम कभी संग ए मलामत,
कुछ ख़्वाब, चंद उम्मीदें याँ, इक शमा जलाये रखना

बे ख़बर थे अहल ए जहां होंगे मुन्हरिफ़ ग़ालिब,
धूवाँ सा फ़िजा, हाल न कर बयाँ, इक शमा जलाये रखना

दानिस्ता मिलोगे संग ए आस्तां पर जब ‘हया’ से,
अगर वो मिलने भी न आया, इक शमा जलाये रखना

डॉ नम्रता कुलकर्णी
बेंगलुरु
२१/०५/१७

वाईन आणी व्हिस्की…Wine and Whiskey…

तू उच्चभ्रू, उच्चशिक्षित अशी वाईन जरी,
मी मखमली दमदार मदमस्त व्हिस्कीच खरी।

तुला प्यावयास लागे नाजूक प्याली,
मला मात्र मिळे दणकट ग्लासच भारी।

तुझा जन्म जाहला द्राक्षाच्या मळी,
माझ्या जन्माची कहाणी शेतात खरी।

तू न मिसळते कधी कोणाशी जरी,
बर्फ अन पाणी मात्र माझे सगे सोयरी।

कधी चढे गुलाली,कधी तू चंद्रकांती,
माझी स्थितप्रज्ञता माझी सुर्यकांतीच बरी।

तुझी नशा चढे हळुवार बाई,
माझिया नशेला होते घाईच भारी।

तू कॉकटेल च्या लाऊंज ची राणी,
मी कॉर्पोरेट मीटिंग ला आणते रंगत भारी।

तुझी नी माझी बातच न्यारी,
मैफिलीत चढे आमच्या मुळेच खुमारी।

चियर्स…🍷🥃😁😜

NK

ह्या बाबाचं मन…

ह्या बाबाचं मन…

सगळ्या बाबांना समर्पित🙏🙏🙏

हळूच साद आली कानावर, अहो बाबा होणार तुम्ही पण,
मोहरून गेलो ऐकून जेंव्हा घातली निसर्गानं गवसण।

पोटचं पिल्लू जन्माला आलेलं दिसत होतं हो मला पण,
ह्या बाबाचं गहिवरलेलं मन, कळत होतं का कुणाला पण ?

इवल्याश्या बोटांनी माझं बोट गच्च धरलेला तो क्षण,
सोसल्या जरी नाहीत कळा, झालं होतं माझं पण बाळंतपण

दुरूनच बघता बघता सरून ही गेलं त्याच बालपण,
झुरत होतो खेळण्यापरी, रिक्तच राहिलं खरं माझं आंगण।

शाळा-कॉलेज च्या फी फेडण्याची चणचण,
राब राब राबलो हे दिसलं नाही का कुणाला पण ?

सोप्पं केलं गणित, केमिस्ट्री, फिजीक्स, बाओलॉजि पण,
थकलो होतो तरी सांगितलं होतं का कुणाला पण ?

केल्या सहली, साजरे केले होते सगळेच वार अन सण,
विसरुनी गेले त्या बाबाला दिसले नाहीत हृदयाचे व्रण !

ही रमली मुलांच्यात, मुलांचीच काळजी करायची क्षणोंक्षण,
माझे होताहेत हाल बहाल हे कळलं का नाही तिला पण ?

लेक नांदली सासरी, मुलगा संसारात सुखी अन सून पण,
ह्या बाबाचं मन मात्र राहिलं एकटच, जणू शेताचं कुंपण !

झिजल्या चपला, थकलो आता फिरून गावभर वणवण,
बाबाच्या जीवाला लागला घोर, कुठे गेलेत रे सर्वजण ?

नाही कोणी मदतीला, जाणवते रे थोडीशी आज कणकण,
ह्या बाबाचं मन, अजून का नाही कळत कुणाला पण ?

आसुसलयं तुमच्या ओलाव्याला आता रखरखीत म्हातारपण,
मुलं वसली बाहेरगावी, सोडून गेली रे, ती म्हातारी पण।

आयुष्याच्या उतरणीला येते रे सगळ्यांची आठवण,
पापण्यांनी आसवं पुसत, स्मृतींचे उतू गेलंय आधण।

आता लटकलोय तसबीरीत, घातलाय चंदनाचा हार पण,
पिंडाला कावळा न शिवता, करत राहिला तो भ्रमण…
करत राहिला तो भ्रमण…
ह्या बाबाचं मन, कधीच कळलं नाही रे कुणाला पण…
कधीच नाही कळलं कुणाला पण…!!!

NK
११/०६/१८

The Path Less Trodden…

This is a beautiful poem in Marathi by my good friend Dr Charuta Gaiki…Which I have attempted to translate in English…

The path less trodden…

O death ! Come just once for me, as you come for others with much ease,
Wandering through weary bodies, come like the meandering enchanting breeze…

The rippling water shimering in the luminescent moon beam,
Come like the unimaginably imaginable exquisite dream…

Take me from the realm of existence to nothingness,
As the sky embraces the earth in the arms of the horizon’s infiniteness…

Leaving behind all the baggage and walking along the footprints of time,
Along the unknown, unseen path fading over the mountains we’ll climb...

NK

दुआ…रमज़ान मुबारक़…Dua…Ramazan Mubarak…

दुआ…

माहताब छुपा बैठा है सितारों के काफिलों में,
याँ नमाज़ी चले रखने रोजे ख़ुदा की महफिलों में

इबादत से मांगते है दुआ सलामती की ऐ मौला,
कुबूल कर दे उन्हें रमज़ानी माह ओ सालों में

चाँद उतरा फलक से, चाँदनी की आराइश लिए,
हो रही इफ्तार की तैयारी
दुआओं से क़बीलों में

गुलों ने गुलफ़ाम, सितारों ने सलाम भेजा है जनाब,
मुबारक़ बात देते इस रमज़ान हम सबको पैग़ामों में

बरसे आलम में बरकत ओ रहमत की बरसातें,
पैहम चले खुशियों का सिलसिला सब के दिलों में

माफ कर मेरी खता, बख्श दे थोड़ी सी अता,
ज़ुस्तजू इक बूँद के तिश्नगी की इन बादलों में

आलम तरसे चाँद के दीदार को आसमानों में,
हमको होश कहाँ है, खो गए जो तेरे ख़यालों में

तेरे दीदार पर ख़त्म होंगे रोज़े लब ए बे सवालों में,
मनायेंगे ईद उल फितर न उलझा तू अब बवालों में

NK
६/६/१८

Results of examination…

It’s post examination time, result after result is getting declared…Some passing with flying colours…Some not so…

From a child’s perspective…The path unknown…

Dear mother…

I tried my best and you know the rest…
Though got a little less than you wanted in my test…

Its always a game of gamble, a win or loss…
Don’t make me feel like my life’s a waste…

Differing capabilities, differing results…
Everyone has a role to play in life’s contest…

A door closes and another one opens,
I was meant to walk through this one in a jest…

Knowing your warm embrace awaits my return…
Gonna walk the path unknown at your behest…

Dear Mother, I know I fear the path now I take…
Be there for me when I return as a guest…

Your loving child…

NK

04/06/18

शब्दांचे चांदणे…Shabdanche Chandane…

शब्दांचे चांदणे…

शब्दांच्या चांदण्यात मी मज हरपून बसले ग,
सखे,त्या पुनवेच्या चंद्रा संगे एकटीच जगले ग।

गुंफीत शब्दांच्या माळा हे भाव व्यक्त केले,
चांदणे शिंपडूनी , मनाचिया बागेत फिरले ग।

ही चांद चकोर, ती पौर्णिमेची लख्ख भोर,
एखादी रात अमावसेची, ना चांदणे ना कोर ग।

चांदणी शब्दांना माळीत, भावनांना गुंफले ग,
शब्दावाचून मनातल्या घोर अंधारात हरवले ग।

एकटी वाट बघते, रात आली चांदणं घेऊनी,
कवेत निजवूनी, मिठीत घेऊनी शब्दांना बिलगले ग।

परते रात पुनवेची, शरदाचे चांदणे पांघरोनी,
ह्या शब्दांना गवसूनी माझी मी निशब्द झाले ग।

NK
22/10/17

मानवा…Manawa…

मानवा…

मज केलेस बंदी,
जखडूनी मानवा।

दोष कोणास देऊ,
जन्मा घातला दानवा।

निर्गुणी, निराकारी,
मूर्त का असावा ?

दगडात बंदिस्त,
मज का जखडावा ?

थिजले अश्रू नयनी,
कसा दिसेल ओलावा ?

प्राक्तनांचा नकाशा,
कोणी हा फाडावा ?

का रे मज मागतोस,
अस्तित्वाचा पुरावा ?

भौतिकवादी होऊनी,
दिलास का दुरावा ?

NK
24/05/18

This picture is of a Buddha head relic found in Ayutthaya, Thailand. Picture is just a representation of almighty in a concrete form, which I felt expressed the thoughts behind the poem best…No other conclusions to be taken.

Related philosophy by

Dr Hitesh Adatiya

🙏🏻🌻🙏🏻🌻🙏🏻🌻🙏🏻🌻

निर्गुण निराकार की, सगुण साकार, की फक्त ओंकार ?
असित्व आपलं त्या असित्व दात्या कडे आणी प्रयत्न आपला त्यालाच असित्व द्यायचा।
पण जर त्याला आकार दिलाच नाही तर मन लावायचं कुठे ? कारण त्याला तर सवय पडली आहे आकाराची।
देहाभिमानी मनुष्य देहा शिवाय मन लावू शकत नाही।
जुडेल तर मनानी आणी मनानीच सारे व्यवहार करेल।
मन सुरु करेल आकार नी आणी परिपक्व झालं की वळेल फक्त ओंकार या चिन्हा कडे आणि संपूर्ण परिपक्व झाल की पहोचेलं निराकार कडे ।
आकार, ओंकार आणी निराकार ची ही यात्रा मन करेल, आणी ह्या जीवनात नाहीच जमलं तर प्रगति चा प्रयत्न करूया पुढच्या जीवनात !
भौतिक जीवनाच्या प्रपंचात कधी कधी न आकार आठवतो न निराकार आणि ओंकार तो फक्त शब्द म्हणून प्राणायाम करतांना।

बरेच थोर पुरुष येऊन गेले, कोणी आकारा कडे बोट दाखवले कोणी निराकारा कडे, कोणी फक्त ओंकारालाच महत्व दिले।
कोणी परिपूर्ण संतांनी आकार, निराकार आणी ओंकार तिन्हीची व्यवस्थित मांडणी केली।
पण आपण त्यांनी काय समजून देण्याचा प्रयत्न केला त्याचावर लक्ष न देता बुद्धि गहाण ठेऊन लगालो भांडायला ।
आमचे महान तुमचे छोटे आणि खोटे।
आमचेच श्रेष्ठ आणि तुमचे निम्न।
बुद्धि ला परिपक्व न करता मन आणि हृदयाला परिपक्व करायला निधालो.
जगातली सर्व भांडणं या आकार निराकारा मुळे।
डोक्या वर हात ठेऊन बसले असतील ते सगळे महापुरुष की काय शिकवायचं होत आणि हे बुद्धिमान लोक काय शिकले।
तो आकार निराकार पण या संभ्रमात असेल की शेवटी मी आकारी आहे की निराकारी ?
देवानी बुद्धि दिली ते स्वतःची ओळख करुन घेण्या साठी आणि त्याच्या सोबत परिपक्वते नी संबंध जोडून घेण्या साठी,त्या बुद्धि चा योग्य वापर करा।
डोळे बंद, मन बंद, बुद्धि बंद, केल्यानी त्या महान रचनाकारा ची ओळख कशी होईल ?
थोर पुरुषांचे विचार,संतांचे विचार जाणून घ्या पण स्वतःच्या बुद्धि चा वापर करून आपल्या त्या पिता माता रचनाकार ईश्वर सोबत आपले संबंध प्रस्थापित करा।
भौतिक जगताच्या प्रपंचा मध्ये राहून आध्यात्मिक जगता मधे पण आपला विकास करून द्यायचा हीच खरी बुद्धिमत्ता आहे।
आकार निराकार ओंकार एकाच शक्ति चे वेगळे वेगळे नाव।
जे नाव आवडेल त्या नावानी जुडण्याचा प्रयत्न करा आणि या देहाचा, मनाचा, बुद्धिचा आणी आत्म्यचा उद्धार करून घ्या।

🙏🏻🌻🙏🏻🌻🙏🏻🌻🙏🏻🌻

नशिबी जे नव्हतंच…शेवटचे शब्द…Not Destined To Be…Last Words…

नशिबी जे नव्हतंच…शेवटचे शब्द…

माझ्या श्वासांवर जर असते रे नियंत्रण माझे,
बघितली असती वाट होऊनि हृदय बेचैन माझे

तू लावले असतेस जर जखमांवर मलम कधी रे,
ठेवला असता विश्वास तुज हृदय देऊन माझे

सतत शोधणार्या नजरेला झाली होती प्रचिती,
साथ लाभता तुझी झाले असते प्रफुल्लित जीवन माझे

तू भेटशील अजूनही कुठल्या तरी क्षणी अशीच प्रार्थना,
स्वप्नात होऊ दे मिलन हे मनोरथ, हेच स्वप्न माझे

खोल हृदयी लपवून ठेवू तुला हीच आकांक्षा घेऊनी,
लाभेल हृदयी शांतता अन होईल शांत हे मन माझे

नाव तुझे ओठावर घेऊन निघाले शेवटच्या यात्रेस,
माझिया न ताब्यात कधी उडेल मन पाखरू पिंजऱ्यातून माझे

श्वासांचा पदर ओढूनी आले नम्रतेने तुझ्या कुशीत,
तुझिया दारी घेईन श्वास अखेरचा हेच प्राक्तन माझे

डॉ नम्रता कुलकर्णी

बेंगलूरु, १४/०३/१८