श्याम रंगला…Shyam Rangala…

Wishing you all a happy and colourful holi…❤🧡💛💚💙💜💖

श्याम रंगला…

होळी खेळूनी मज संग सखे ग, श्याम बघ रंगला,
मज रंगवूनी, अंग चिंब भिजवूनी,कुठे ग लपला?

कळी गुलालाची उमलून हसली ह्या श्वेत गालावर,
नजर शोधे हाता मागूनी, क्षणात मज लाजवला।

हिरवा, निळा रंग मोरपंखाने हळूच त्याने लाविला,
यौवनात मज भासवूनी, मोहना अंतरी ग हरवला।

रंग मैत्रीचा शोभतो पिवळा तो सांगूनी मज गेला,
श्याम कांति वर पीतांबर शोभनीय घालूनी, कुठे रे दडला ?

माथ्यावर झळकली लाली, रक्त-तिलक लावीला,
मज निस्सिम प्रेम दाखवूनी, कान्हा का ग दुरावला ?

श्वेतांबरी मोहीनी तू नार नवेली म्हणत असे मला,
रंगात रंगवूनी,चोरूनी मना, ह्या हृदयी ग लपला।

डॅा नम्रता कुलकर्णी
बेंगलुरु

Advertisements