जुगनू…Juganu…

आसमां में चले सितारों के कारवां,
अंधेरी रातों में रोशनी लिए,
ऐ चाँद तू कही रास्ता न भूल जाये,
आये है हम देने साथ इक जुगनू की तरह…

NK

Advertisements

जाणीव…Jaaniv…

साद घालतेय बघ कोकीळ,
तिला कदाचित माझ्या घालमेलीची जाणीव…
आर्त स्वरांची जुगलबंदी,
सुरेल सुमधूर स्वरांनी भरली,
माझ्या गाण्याच्या शब्दांची उणीव…
NK

काळरात्री…Kaal ratri…

माथी टिळा कुंकवाचा,
लोहगोल जगद्श्रुष्टीचा…
मुखमंडळी झळके ज्वलंत जिव्हा,
मागणे माते माझे एकच आता…
रक्तरंजित तव हातांनी,
ह्या काळरात्री कर तू नाश दानवांचा…
NK
🙏🙏🙏

शुक्राची चांदणी…Shukrachi Chandani…

चांदणे शिंपडीत चालली,
शुक्राची ती चांदणी…
मदमस्त चंद्राचीच जणू,
प्रेयसी ती शुभ्रकणी…
उतरली श्यामल नभातूनी,
तोडून तुकडा हिरकणी…
उमलली पाकळी प्राजक्ताची,
माझिया अंगणी…
NK

कृष्ण कांती… Krishna Kaanti…

घन निळा बरसे अंबरात,
नीलकंठ उडे निळ्या आभाळात,
सागराचा रंग पण बघ निळा, निळ्या नयनातून राधेच्या, अश्रूंनी भिजला कृष्ण निळ्या रंगात!!!
NK

वियोग… Viyog…

कधी होती मी तुझ्याच संग, तुझ्या संगती थरथरायचं हे अंग, होऊनी वेडे दोघेही दंग, मन उडत असे जसा आकाशी पतंग, झालो कसे रे मग निसंग, नियतीने केला प्रेमात भंग, वियोगाचे हास्य कसे ते सांग…? परत होऊनी एकरूप उठतील का रे तरंग…?

NK

आठवण…Aathawan…

आठवणींच्या माळरानात हरवली,
स्मृतिफुलांनी ओंजळ भरली,
एकेक पाकळी हळूच फुलली,
स्मृतीसुगंधानी आसमंतात दरवळून गेली…
NK