प्राजक्त…Prajakta…

पहाट प्रहरी सखे साजणी,

प्राजक्ताचा सडा अंगणी।

आकाशगंगेतून शिंपडली,

जणू मिहिराने ती चांदणी।

काळ्या मातीला मोहरूनी,

गेलीस जवळून शिंपडूनी।

दवबिंदू सम अत्तर सुगंधी, 

श्वेत केशरी सौरभ स्पंदनी।

मोत्यांना त्या माळून वेचूनि,

अर्पूनी निराकारी निर्गुणी।

NK

20/07/17

गुरू पौर्णिमा…Guru Poornima…

गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा🙏🏼🙏🏼🙏🏼
गुरू ब्रम्ह, गुरू विष्णू, गुरू देवो महेश्वर,

गुरू साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः।।

गुरु पूर्णिमा
गुरु म्हणजे कोण…?
ना वयाचे बंधन…ना नात्याची जोड
त्यास नाही कोणाची तोड

ज्यासी आहे अगाध ज्ञान

जो करी त्याचे निस्वार्थ प्राख्यान

त्याची सी गुरु मानावे

देवास तेथेची पावावे ।

माझी आई माझी आद्य गुरु
दिलेसी मज जीवन करूनी सूरू

माझे पिता झाले मम द्वितीय गुरु
कष्टांने केलेसी पायावर उभं तरू

माझे मित्र पण झाले माझे गुरु
शिकवले मजसी जीवनात कशी मैत्री करू

विद्यालयातील शिक्षक निरंतर गुरु
करतृत्ववान केलेसी करून शून्यातून सूरू

माझा जीवन-सखा देखील मम गुरु
देतोसी दैनंदिन जीवन मार्गदर्शन करू

देते मजं रोज नवीन ज्ञान, माझे लहान लेकरू
आई जरी मी , झाले लेकरू माझे महान गुरु

जीवनातील प्रत्येक टप्यात जनासी भेट करू
शिकवले काही थोडेसे सर्वांनी बनून माझे गुरु 

ज्याने शिकवीले मजसी तोची मानावा गुरु 
सर्व गुरुंना वंदन करूनी करू गुरु पूर्णिमा सुरू

नम्रता कुलकर्णी 
बेंगलुरु, ०९ जुलै १५