ह्या बाबाचं मन…Hya Baba ha Man…

Dedicated to my father…

ह्या बाबाचं मन…

पिल्लू जन्माला आलं दिसतं होतं मला पण,
ह्या बाबाचं मन, कळतंय का कुणाला पण ?

दुरूनच बघता बघता सरून गेलं बालपण,
ह्या बाबाचं मन, कळतंय का कुणाला पण ?

शाळा-कॉलेज च्या फी फेडण्याची चणचण,
ह्या बाबाचं मन, कळतंय का कुणाला पण ?

सोप्पं केलं गणित, तर कधी फिजीक्स पण,
ह्या बाबाचं मन, कळतंय का कुणाला पण ?

ही रमली तुमच्यात, करी काळजी क्षणोंक्षण,
ह्या बाबाचं मन, कळतंय का कुणाला पण ?

लेक नांदली सासरी, मुलगा सुखी सून पण,
ह्या बाबाचं मन, कळतंय का कुणाला पण ?

झिजल्या चपला, फिरून थकलो वणवण,
ह्या बाबाचं मन, कळतंय का कुणाला पण ?

नाही कोणी मदतीला, आहे रे थोडी कणकण,
ह्या बाबाचं मन, कळतंय का कुणाला पण ?

आसुसलयं तुमच्या संगतीला हे म्हातारपण,
ह्या बाबाचं मन, कळतंय का कुणाला पण ?

लटकलोय तसबीरीत, छान घातलाय हार पण,
ह्या बाबाचं मन, कधीच कळलं नाही रे कुणाला पण !!!

NK
18/06/17

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s