मी माझ्यासाठी…Mi Majhya sathi…

मी माझ्यासाठी…
आपण बरं नी आपलं जग बरं,

काय करायच मरू देत सारं,

कापतायत् झाडं, टाकतात कचरा,

ओसंडून पाण्याची नासाडी करा,

फरक काय पडतोय मला,

काही फिकीर आहे का कोणाला,

 मी जगते माझ्यासाठी…
सत्ते वर कोण आलं कोण गेलं,

कोणी किती केले सट्टे नी जुगारं,

किंमत नाही माणसांची इथे,

मुंग्यागत झाली माणसं जिथे,

देश गेला खड्यात,कमळ की हात,

काय फरक पडतोय माझ्यात,

मी जगते माझ्यासाठी…
जगले की मेले काय फरक पडतो,

भिंती वर टांगलेला एक फोटो दिसतो,

क्वचित त्यावर एक हार असतो,

वर्षश्राधाला कावळा शिवतो,

नाही कुणाला आठवण ना खंत,

हाच तर खऱ्या अर्थाने अंत,

म्हणूनच मी जगते माझ्यासाठी…
NK

2/5/17

Disclaimer: The above poem is not meant to hurt anyone’s feelings and is to be taken in the right spirit of writer’s liberty.

Advertisements

4 thoughts on “मी माझ्यासाठी…Mi Majhya sathi…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s