कवडसा…Kawadasa…


कवडसा…

कवडसा, कवडसा दिसतोस् कसा ?

तू आहेस तरी कोणाचा बरं वारसा ?
पानां मधून, ढगाच्या आडून, फटीतून,

अंधाराला छेदून, पल्याड येतो कसा ?
येतोस तिन्ही त्रिकाळी, वेळी अवेळी,

उल्हासित करून देतो मनाला दिलासा।
सजणीनं साजणाला पहिल्या भेटीत,

लाजून तिरक्या नजरेनं पाहिलं जसा।
शांत शीतल चांदण्यांच्या अंगणात,

चांद चकोराने शिंपडला गारवा असा।
अवचित जाग यावी पहाटे सकाळी,

झरोख्यातून झीरपला मिहिरच जसा।
मनमंदिराच्या शांत गाभाऱ्यात शिरून,

विचारांचा लुकलूकणारा दिवा इवलासा।
अंतर्मनाचा जणू तू निर्मळसा आरसा,

तिमिरातून तेजोन्मयी नेणारा एवढासा…कवडसा…!!!
NK

18/05/17

गुलमोहर…Gulmohar…

गुलमोहर…
करीत रणरणत्या उन्हाशी सामना,पेटला ग वैशाखाचा वणवा,

कुठे हळूच डोकावतो जणू हिरव्या पानांचा थंड गारवा।
लाल पिवळ्या हळदी कुंकवाच्या रंगापरी निळ्या आभाळात शोभला,

मोठया तोऱ्यात डोले गुलमोहर, करी सामना तेजोन्मयी मिहीरा शी एकाला।
निळ्या नभाच्या शालू वर जणू कशिदा कारी नारंगी धाग्यांची,

नटून थटून सजलेली वसुंधरा वाट पाहते मेघ राजाची ।
तर असा हा गुलमोहर सखे, मज मनासी भावून गेला,

आकाशगंगेतून जणू चित्रगुप्ताने धरला कुंचला आणि रेखीत गेला।
NK

१५/०५/१७