गुढी पाडव्याच्या शुभेच्छा…

चैत्र सुरू झाला, करू साजरा गुढी पाडवा,
नवीन वर्ष साजरे करून, आनंद द्विगुणीत वाढवा।
घराच्या अन मनाच्या ही सफाईचा केर काढावा,
जुन्या नवीन सर्व नात्यांचा स्नेह संबंध जोडावा।
जुने वर्ष सरले, तसे लोभ मत्सर बाजूला सारावे,
नवीन वर्षात तुम्हास प्रेम, करूणा नी वात्सल्य लाभावे।
नव वर्षाच्या शुभेच्छा 🙏🌾🌿🍃🌹🌷
NK
२८/०३/१७

डॅाक्टर…Doctor…

डॅाक्टर…

“अहो मी डॅाक्टर होणारंSSS
छोट्या बाळाला, औषध देऊनी,
बरे मी करणारंSSS”
असं लहानपणचं एक बालगीत होतं…
लहानपणी भावंडासह खेळ खेळायचो
मीच डॅाक्टर होणार म्हणून भांडायचो।

असे प्लास्टिक चा स्टेथोस्कोप अन सूई,
तू हो पेशंट, मला डॅाक्टर व्हायची घाई।

मोठे झालो, स्वप्न पाहीली, मोठे होण्याची,
गरीबांना मदतीची, जगाला बरे करण्याची।

दिवस रात्र अन वर्षों वर्षे राब राब राबलो,
मेल्यागत होऊन, जगाचे मोह सोडून जगलो।

पांढऱ्या कोटावर शिव्या, लाथांनी रक्तरंजित डाग,
गळ्यात फासागत स्टेथोस्कोप घालणे भाग।

लहानपणी पाहीलं स्वप्न होतं, ते तसच राहीलं,
आयुष्य मात्र कोर्ट कचेऱ्यांच्या पायऱ्यांना वाहीलं।

डॅा नम्रता कुलकर्णी
बेंगलुरु
२१/०३/१७