जिंदगी का सफर…Jindagi Ka Safar…

jindagi ka safar

Advertisements

रिइनकार्नेशन…???पुनर्जन्म…??…सोलमेट…? Reincarnation…??? Poonarjanma…?? Soulmate…?

रिइनकार्नेशन…???पुनर्जन्म…??…सोलमेट…?

तो आला दोघांची नजरेला नजर भिडली
कुठेतरी बघीतल्याचा भास का बर झाला ?

रोमां-रोमांतून एक शिरारी अशी सरकली
अंगावर सरकन काटा का बर उभा राहीला ?

श्वासो-श्वास वाढला जणू काही आस होती मला
अचानक मधेच मग श्वास का बर अडकला ?

छातीची धडधड कुणाला ऐकु तर नाही गेली
हृदयाचा ठोका असाच का बर चुकला ?

खोलवर मनातली अंधुकशी धूसर आठवण
कुठे पाहिले त्यास का आठवत नाही मला ?

वाटतो खूप जिवलग, जणू काळजाचा तुकडा
नाते काय असेल आमुचे का कळेना मला ?

काळाच्या अनंत ओघात दोन जीवात्म्यांची…
दोन सत्वांची, चैतन्य मिळवण्याची आस असेल का?

का गतजन्मीच्या अधुऱ्या आकांक्षा आणी इच्छा,
असेल का हाच तो माझा हरवलेला जिवलग सखा ?

डॅा.नम्रता कुलकर्णी
बेंगलुरु
१९/१०/१५